दुःखद बातमी

शांतिवन परिवाराचा जिवाभावाचा कार्यकर्ता आणि पुण्यातील आजोळ प्रकल्पाचा प्रमुख मंगेश कानपाठक याचे वडील शरदराव कानपाठक यांचे आज दुपारी बीड येथील विठाई हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले. गेल्या तीन दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर बीड येथील हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. आम्ही सर्वांनी त्यांना आजारातून बरे होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण दुर्दैवाने यश आले नाही. अँजिओप्लास्टी नंतर त्यांच्या दोन्ही किडन्यानी काम करणे थांबवलं. खुप प्रयत्न करूनही आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा स्वाश घेतला . मंगेश आणि कानपाठक परिवारावर कोसळलेल्या दुःखात शांतिवन परिवार सहभागी आहे. कै . शरद काकांना भावपुर्ण श्रद्धांजली .
दीपक नागरगोजे
शांतिवन, बीड